सफदरजंग रूग्णालयात रोबो करणार शस्त्रक्रिया


दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात लवकरच काही शस्त्रक्रिया रोबो करणार आहेत. कांही ठराविक प्रकारच्या शस्त्रक्रिया हा रोबो करणार असून त्यासाठी १८ कोटी रूपये खर्चून त्याची खरेदी केली केली जात आहे.यामुळे आर्थिक परिस्थिती दुर्बल असणार्‍या रूग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ होईल तर आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या रूग्णांवर फी आकारून शस्त्रक्रिया केल्या जातील.

रूग्णालयाच्या युरॉलॉजी विभागाचे प्रमुख व मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ञ सर्जन डॉ. अनूपकूमार म्हणाले, या रोबोच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून येत्या २ ते ३ महिन्यात तो रूग्णालयात तैनात होईल. मूत्रपिंड प्रत्यारोपण व अन्य अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया हा रोबो कुशलतेने करू शकेल. खासगी रूग्णालयात या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी ४ ते ५ लाख रूपये खर्च येतो. रोबो मुळे या शस्त्रक्रिया कमी खर्चात होऊ शकणार आहेत.

Leave a Comment