स्वस्तात मस्त परदेशी सहली साठी बेल्जियमला चला


सुट्याचा सीझन सुरू झाला की प्रवासाचे, सहलींचे बेत होऊ लागतात. देशविदेशातील सहलींबद्दल विचार विनियम होऊ लागतात. सहलींसाठी युरोपसारखा खंड नाही असे अनेकांचे मत असले तरी युरोप सहलींसाठी येणारा खर्चही मोठा असतो. मात्र स्वस्तात मस्त युरोपची टूर करायची असेल त्यांनी बेल्जियम या नितांतसुंदर देशाचा विचार नक्की करावा. या छोट्याशा देशात अनेक सुंदर शहरे आहेत व ती आकाराने लहान असल्याने तेथे सहजी पायी रमतगमत फिरण्याचा आनंद लुटता येतो.

या देशाला वास्तुकलेचा समृद्ध इतिहास आहे. खाण्यापिण्याची येथे चंगळ आहे तर फॅशनच्या बाबतीत तर हा देश हाय तोबा आहे. अन्य शहराच्या तुलनेत या देशाच्या फ्र्लंडर्स शहरात राहण्याचा खर्च कमी आहे. ब्रसेल्सपासून ट्रेनने आसपासची गांवे पाहात येथे जाता येते. बेल्जियममधील घेट, ब्रुग्ज, अॅंटवर्प, ल्यूसेन ही शहरे एकमेकांपासून २० मिनिटे ते १ तासांच्या अंतरावर आहेत. ल्यूवेन हे वर्ल्ड हेरिटेज साईट असलेले शहर बेल्जियमची बियर कॅपिटल म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील ओल्ड मार्केटमध्ये जगातील सर्वाधिक लंाबीचा बार असून या शहरात ४५ पब्ज आहेत.


ब्रसेल्स मध्ये कॉमिक वॉक जरूर घ्यावा तसेच अँटिक मार्केटलाही जरूर भेट द्यावी. अर्थात खरेदी करताना घासाघीस केल्याशिवाय करू नये. ब्रुग्ज हे रोमँटिक शहर आहे. येथील कॉलवे आणि चॉकलेटची मजा लुटायला हवीच. अँटवर्प हे जगातल्या पाच प्रसिद्ध स्टेशनपैकी एक असून येथे आमीरखानच्या पीकेचे शूटिंग झाले होते.

फ्लँडर्स शहर हे राहण्यासाठीच्या अनेक सुविधा स्वस्तात पुरविणारे शहर आहे त्यामुळे येथे मुक्काम टाकून बाकी ठिकाणी फिरता येते. येथे यूथ हॉस्टेल्स व हॉलीडे अपार्टमेंट खूप आहेत व तेथे अगदी स्वस्तात राहण्याची व्यवस्था होते. ही ठिकाणे वर्षभर खुली असतात. जेवणखाणही अतिशय चांगल्या दर्जाचे व सहज परवडणार्‍या किमतीत येथे मिळते. वायफाय, लॉकरच्या सुविधाही आहेत. बिअर शौकीनांसाठी येथे अनेक प्रकारच्या बियर आहेत. घेंट शहर एकसोएक रेस्टॉरंटस व शेफ साठी प्रसिद्ध आहे. येथील चविष्ट पदार्थांची चव आयुष्यभर विसरली जात नाही असे अनुभवी सांगतात.

Leave a Comment