आत्महत्या लाईव्ह पोस्टसंदर्भात फेसबुकचे सुरक्षा उपाय


गेले कांही महिने फेसबुक या सोशल साईटवर आत्महत्त्या, स्वतःला तसेच दुसर्‍याला दुखापती करत असल्याचे लाईव्ह पोस्ट व व्हिडीओ प्रसारित केले जात असल्याने सजग बनलेल्या फेसबुक ने त्यांच्या रिव्ह्यू टीममध्ये ३ हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकच्या रिव्ह्यू टीममध्ये ४५०० लोक कार्यरत आहेत त्यात आणखी तीन हजारांची भर पडणार आहे. यामुळे युजर्सना असे डिस्टर्ब करणारे व्हिडीओ अथवा लाइव्ह पोस्ट सार्वजनिक होण्याअगोदरच काढून टाकण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी फेसबुक कायद्याची व कायदा तज्ञांची मदत घेत असल्याचे संस्थापक मार्क झकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

आपल्या पोस्टवर झुकेरबर्ग म्हणतो, गेले काही दिवस सातत्याने असल्या प्रकारांचे चित्रण असलेले लाईव्ह तसेच व्हडीओ पोस्ट केले जात आहेत ही अतिशय त्रासदायक बाब आहे. यामुळे असल्या कंटेंटवर त्वरीत अॅक्शन घेता यावी यासाठी आम्ही नवीन टूल आणत आहोत तसेच आमच्या रिव्हयू टीम मधील लोकांची संख्याही वाढवित आहोत. आमच्याकडे असल्या त्रासदायक पोस्ट संदर्भात लाखोंनी तक्रारी येत आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आम्हाला आमच्या कामाचा वेग वाढविणे भाग आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

एप्रिलमध्ये मुंबईत एका विद्यार्थ्याने १९ मजल्यावरून उडी मारतानाची लाईव्ह पोस्ट केली होती. यूएस, थायलंडमध्येही असले प्रकार घडले आहेत.

Leave a Comment