‘जीसॅट-९’चे यशस्वी प्रक्षेपण


नवी दिल्ली – दक्षिण आशियाई उपग्रहाचे (जीसॅट-९) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) शुक्रवारी अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोच्या जीएसलव्ही एफ-०९ या प्रक्षेपकाच्या मदतीने श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरून जीसॅट-९ चे प्रक्षेपण करण्यात आले. २३५ कोटींचा खर्च जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्त्रो’च्या या कामगिरीचे कौतूक केले आहे.

Leave a Comment