वस्तू पाहू शकणारा कृत्रिम हात विकसित


वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवीन गोष्टींचा शोध लागत आहेच पण आता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचीही चांगली जोड मिळते आहे. कृत्रिम अवयव बनविणे आजकाल फारसे नवलाचे राहिलेले नाही. मात्र त्यातही आता आधुनिक तंत्रज्ञानाने अशक्य बाबीशी शक्य होत आहेत. संशोधकांनी आता असा कृत्रिम हात तयार केला आहे जो वस्तू स्वतःच पाहतो व त्यानुसार त्या कशा उचलायच्या याचा निर्णय घेतो. या हातावर एक कॅमेरा लावला गेला आहे. हा कॅमेरा उचलायच्या वस्तूचे विविध अँगलनी फोटो काढून ते इलेक्ट्राॅनिक मेंदूकडे पाठवितो व तेथून वस्तू कशी पकडायला हवी याच्या सूचना हाताला दिल्या जातात.

कृत्रिम अवयव तज्ञ डॉ. किएनोश नजरेपोर यांच्या म्हणण्यानुसार ही फारच चांगली पद्धत आहे. तंत्रज्ञानच्या विकासामुळेच हे शक्य झाले आहे. पेन्सिलीपासून सफरचंदापर्यंत व बाटलीपासून कपापर्यंत हात ठराविक पोझमध्ये या वस्तू पकडतो. प्रत्येक वेळी ही पोझ वेगळी असते.हा कृत्रिम हात हेच काम आधुनिक तंत्राने करतो. त्यासाठी ५०० प्रकारच्या विविध वस्तूंचे विविध कोनातून घेतलेले ७० फोटो या हातावर बसविलेल्या कॅमेर्‍यात फिड केले गेले आहेत. त्यानुसार या हाताला वस्तू कशी पकडायला हवी याचे आदेश दिले जातात.

Leave a Comment