तपकीरी रंगात येतेय १०० ची नवी नोट


नोटबंदीनंतर ५०० व २ हजार रूपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. लवकरच शंभर रूपये मूल्याची नवी नोटही चलनात आणली जात असल्याचे सांगितले जात असून ही नोट पाचशे रूपयाच्या नव्या नोटेप्रमाणे असेल पण तिचा रंग तपकीरी असेल असे समजते. या नोटेसाठीच्या पेपर चाचण्या पूर्ण झाल्या असून रिझर्व्ह बँकेकडून मान्यता आल्यानंतर या नोटांसाठीचा पेपर तयार केला जाणार आहे.

नोटबंदी नंतर पाचशे रूपयाच्या नोटेसाठी पेपर तयार करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या सिक्युरिटी पेपर मिल प्रेस होशंगाबाद येथील सूत्रांकडून शंभराची नवी नोट येत असल्याची माहिती मिळाली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०० रूपयांच्या तपकीरी रंगाच्या नोटेसाठी ट्रायल पेपर बनविला गेला होता व त्यानुसार आता १०० रूपयाच्या नोटेचे डिझाईन तयार केले गेले आहे. ही नोट पाचशेच्या नव्या नोटेच्या आकाराची असेल व त्यावरही म.गांधीची प्रतिमा नोटेच्या मधोमध असेल. रिझर्व्ह बँकेच्या अनुमती नंतर या नोटेसाठीचा पेपर तयार केला जाणार आहे.

Leave a Comment