आता फेसबुक मॅसेंजरवर खेळा ऑनलाइन गेम


आता नवनवीन गेम देखील फेसबुक मॅसेंजरवर युजर्सला खेळता येणार असून फेसबुकने नुकत्याच काही नवीन फिचर्सची घोषणा केली होती. या गेमींग संबंधी फिचरचाही समावेश होता. फेसबुकने आता घोषणा करून हे गेमींग फिचर काही युजर्सना टेस्टिंगसाठी देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. सध्या हे फिचर्स १.२ बिलियन युजर्सना फेसबुक वापरण्यासाठी देत आहे.

फेसबुकने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर एफ ८ या कॉन्फरंसमध्ये मॅसेंजरचे व्हाईस प्रेसिंडेंट डेविड मार्स यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. यात फेसबुक मॅसेंजरद्वारे युजर्सला गेम खेळता येईल अशी ही एक घोषणा होती. कंपनीने माहिती दिली की येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील ऍन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सला हे फिचर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी कंपनी एक अपडेट देणार आहे. हे नवीन फिचर युजर्सला मॅसेंजर अपडेट केल्यावर वापरता येणार आहे.

तुम्हाला या नवीन फिचर्सनुसार मॅसेंजरवरून तुमच्या मित्रांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येणार आहे. तसंच काही गेम हे गृपमध्येही खेळता येणार आहे. शिवाय यात टूर्नामेंट देखील सुरू करता येणार आहे.

Leave a Comment