आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल चिनाब नदीवर


जम्मू – जवळपास २ वर्षांमध्ये जगातील सर्वात ऊंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार केला जात असून आयफेल टॉवरपेक्षा जवळपास ३५ मीटरने अधिक याची उंची असणार आहे. दुर्गम क्षेत्रात जवळपास ११०० कोटी रुपयांचा खर्च येणा-या या अर्धचंद्र आकाराच्या मोठय़ा पूलासाठी २४००० टन इस्पातचा वापर केला जाईल आणि हा पूल नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंचीवर असणार आहे.

२६० किलोमीटर प्रतितास वेगाच्या वा-याला हा भव्य पूल झेलू शकेल. १.३१५ किलोमीटर लांब अभियांत्रिकीचा हा नमुना बक्कल कटरा आणि श्रीनगरच्या कौडीला जोडणार आहे. हा पूल कटरा आणि बनिहालदरम्यान १११ किलोमीटरच्या भागाला जोडणार असून हा भाग उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेसंपर्क योजनेचा हिस्सा आहे.

काश्मीर रेल्वे प्रकल्पाचा सर्वात आव्हानात्मक पूलाची निर्मिती हिस्सा असून तो पूर्ण झाल्यावर अभियांत्रिकीचा आविष्कार ठरेल असे एका अधिका-याने सांगितले. २०१९साली हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे. या भागात येणा-या पर्यटकांसाठी हा पूल आकर्षणाचे केंद्र ठरेल अशीही आशा आहे. पूल उभा राहिल्यानंतर बेइपैन नदीवर असलेल्या चीनच्या शुईबाई रेल्वेपूलाचा (२७५ मीटर) विक्रम तो मोडीत काढेल. पूलाच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. या पूलामुळे राज्यात आर्थिक विकास आणि वाहतूक वाढण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Comment