जपानमध्ये लक्झरीयस डबलडेकर ट्रेन सुरू


जपानमध्ये दोन मजले असलेली अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त स्लीपरसेवा असलेली रेल्वे सुरू झाली असून ही रेल्वे तिचा पहिला प्रवास गुरूवारी म्हणजे आज पूर्ण करत आहे. या रेल्वेसाठीचे तिकीट १० हजार डॉलर्स म्हणजे ६ लाख ४३हजार रूपये आहे व या १० डब्याच्या ट्रेनमधून एकावेळी ३४ प्रवासी प्रवास करू शकत आहेत.

या रेल्वेमध्ये १४ अतिशय झकपक असे कपांर्टमेंट आहेत. शिवाय डायनिंग कार व आसपासचा निसर्ग न्याहाळण्यासाठी दोन ऑब्झर्व्हेटरी कार आहेत. येथे जपानी शेफ एकाहून एक सरस जपानी व फ्रेंच खाद्यपदार्थ सर्व्ह करणार आहेत. शिकी शिमा असे या रेल्वेचे नामकरण केले गेले आहे. टोकयोच्या युईनो स्टेशनवरून ही रेल्वे पहिल्या प्रवासासाठी रवाना झाली व ती चार दिवसांत उत्तर पूर्व जपानची फेरी करून पन्हा याच स्टेशनवर येत आहे.

या रेल्वेचे डिझाईन पोर्शे, फेरारी, मेसेराटी कारच्या मॉडेलप्रमाणे केले गेले आहे. अतिशय कलात्मक पद्धतीने ती वुड पॅनलने सजविली गेली आहे.केन कयोयुकी यांनी या रेल्वेचे डिझाईन केले आहे. ते जनरल मोटर्सचे माजी डिझायनर्स आहेत तसेच त्यांनी कांही काळ पोर्शे, फेरारी येथेही कामाचा अनुभव घेतलेला आहे. या ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये डबलबेड, स्टोरेज, शॉवर, स्वच्छतागृह, बार रेस्टॉरंट अशा सुविधा आहेत.

Leave a Comment