जगातील सर्वात छोट्या स्क्रीनचा स्मार्टफोन जेली लाँच


आज स्मार्टफोन जगतात मोठ्या स्क्रीनच्या फोनची मागणी वाढत असताना काही फोन उत्पादक कंपन्यांनी छोट्या स्क्रीनला अधिक महत्त्व दिले आहे. जगातील सर्वात छोट्या स्क्रीनचा स्मार्टफोन जेली या नावाने लाँच केला गेला असून त्याला २.४५ इंचाचा स्क्रीन दिला गेला आहे. शांघायची कंपनी युनिहर्टस ने हा फोन सादर केला आहे.

वर फोनची १ जीबी रॅम, ८जीबी मेमरी व २ जीबी रॅम,१६ जीबी मेमरी अशी दोन व्हेरिएंट सादर केली गेली आहेत. ८ एमपीचा रियर व२ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड नगेट ७.० ओएस, प्रिइन्स्टॉल गुगल प्ले अशी फिचर्स असलेला हा फोन ४ जी एलटीई सपोर्ट करतो. अमेरिकेत तो व्हाईट, स्कायब्लू, ब्लॅक कलरमध्ये लाँच केला गेला असून त्याच्या किंमती अनुक्रमे ६९०० व ८००० रूपये आहेत. ऑनलाईन शॉपिंग कीक स्टार्टवर त्यांच्या किंमती ५९ डॉलर्स म्हणजे ३८००रूपये व ७५ डॉलर्स म्हणजे ४८०० रूपये दाखविल्या जात आहेत. या फोनची विक्री ऑगस्टपासून केली जाणार आहे.

Leave a Comment