इसुझुची नवी एसयूव्ही एमयू एक्स ११ मे ला भारतात


ऑटो कंपनी इसुझु त्यांची नवी एसयूव्ही एमयू एक्स ११ मे रेाजी भारतात लाँच करत आहे. ही एसयूव्ही त्यांच्या पूर्वी लाँच केलेल्या एमयू ७ ऐवजी भारतात आणली जात आहे. कंपनीने त्यांच्या डी मॅक्स व्ही क्रॉस चे उत्पादन आंध्रातील सिरी सिटी प्लाँटमध्ये सुरू केले आहे. नवी एसयूव्ही एमयू एक्स याच प्लाँटमध्ये तयार केली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

स्थानिक उत्पादनामुळे ही कार स्पर्धात्मक किंमतीत विकणे कंपनीला शक्य होणार असून या एसयूव्हीच्या किंमती साधारण २१ लाखांपासून ते २८ लाखांदरम्यान असतील असे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एमयू एक्स ३.० डिझेल इंजिनसह आहे तशीच ती भारतात असेल. एसयूव्हीचे फिचर्स अजून उघड केले गेलेले नाहीत मात्र या कारच्या भारतातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑटो क्षेत्रातील तज्ञाच्या म्हणण्यानुसार या एसयूव्हीला ५ स्पीड मॅन्यअल व ऑटोमेटिक ट्रान्समिशन दिले जाईल तसेच तिचे मायलेज लिटरला १२ किमी पर्यंत आहे.