सॅमसंग लाँच केले लाखमोलाचे क्यूएलईडी टीव्ही !


मुंबई: भारतात आपला नवा क्यूएलईडी टीव्ही दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने लाँच केला आहे. तब्बल ३ लाख १४ हजार एवढी या नव्या टीव्हीची किंमत आहे. हा टीव्ही नुकताच पॅरिसमध्ये सॅमसंगने लाँच केला होता.

नव्या टीव्हीचे पाच मॉडेल भारतात सॅमसंगने लाँच केले आहेत. क्यु७, क्यु७एफ, क्यू८, क्यू८सी आणि क्यू९ असे पाच मॉडेल आहेत. याच्या बेसिक मॉडेलची किंमत ३ लाख १४ हजार ९०० रुपये आहे. तर सर्वात महागड्या मॉडेलची किंमत २५ लाख रुपये एवढी आहे. यासाठी टीव्हीसाठी प्री-ऑर्डर बुकींग करावी लागणार आहे. इतरही ऑफर या टीव्हीसोबत असल्याचे सॅमसंगने जाहीर केले आहे. या टीव्हीसोबत सॅमसंग गॅलक्सी एस८+ स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पण हा स्मार्टफोन मिळवण्यासाठी तुम्हाला २१ मे पूर्वी बुकींग करावे लागणार आहे.

सॅमसंग क्यूएलईडी टीव्हीचे डिस्प्ले पॅनल साईज ६५ इंच आणि ७५ इंच अशा असणार आहेत. तर क्यू७ मॉडेलची डिस्प्ले पॅनल साईज ५५ इंच असेल. हे टीव्ही क्वॉनटम डॉट टेक्नोलॉजीवर तयार करण्यात आले आहेत. नॅनो साइजचे पार्टीकल देण्यात आले आहेत.

Leave a Comment