हॅकप्रूफ मॅकफी प्रायव्हेट फोन


स्मार्टफोन आम आदमीच्या जीवनाचा एक भाग झाला आहे मात्र त्याबरोबर सायबर गुन्हयाच्या उपद्रवातही मोठी वाढ झाली आहे. यासाठी हॅक होऊ शकणार नाही अशा स्मार्टफोनची गरज निर्माण झाली असतानाच जगातील दिग्गज अँटी व्हायरस सॉफ्टवेअर कंपनी मॅकफी हॅक प्रूफ फोन घेऊन आली आहे.

मॅकफीचे संस्थापक जॉन मॅकफी यांनी जगातला पहिला हॅकप्रूफ स्मार्टफोन कंपनी लवकरच लाँच करत असल्याची घोषणा केली असून हा फोन मॅकफ्री प्रायव्हेट फोन या नावाने सध्या चर्चेत आहे. या फोनचे वैशिष्ठ म्हणजे त्याच्या बॅक साईडला एक खास स्विच दिला गेला आहे. यामुळे युजर स्मार्टफोनचे हार्डवेअर सहज डिसकनेक्ट करू शकणार आहे. या फोनचे फोटो शेअर केले गेले आहेत. त्याची स्पेसिफिकेशन अजून स्पष्ट केली गेलेली नाहीत. मात्र मिडीया रिपोर्टनुसार तो बेस्ट सिक्युरिटी ऑप्शन्ससह येईल. या वर्षअखेर तो लाँच केला जाईल व त्याची किमत अंदाजे ११०० डॉलर्स म्हणजे ७१ हजार रूपयांपर्यंत असेल.

Leave a Comment