जानेवारी ते डिसेंबर अर्थवर्ष लागू करणारे म.प्रदेश पहिले राज्य


मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्याचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर या काळात लागू केले गेल्याची घोषणा केली असून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे वर्ष लागू करणारे भारतातले हे पहिले राज्य ठरले आहे. यानिमित्ताने ब्रिटीश काळापासून सुरू असलेली एप्रिल ते मार्च आर्थिक वर्षाची परंपरा खंडित केली गेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी निती आयोगाच्या परिषदेत राज्य सरकारांनी अर्थवर्षाच्या कालावधी बदलण्याविषयी आवाहन केले होते त्याला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे.

मध्यप्रदेशचे जनसंपर्क मंत्री नरेात्तम मिश्रा म्हणाले मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे अर्थवर्ष पाळले जाईल अशी घोषणा केली. त्यामुळे पुढच्या वर्षीचे अर्थसंकल्पिय अधिवेशन डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या सुरवातीला घेतले जाणार आहे. यंदाच्या वर्षाच्या बजेटची कार्यवाही डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

Leave a Comment