आता आयडिया देणार दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा


नवी दिल्ली: जिओच्या धन धना धन ऑफरनंतर देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे अधिकच दणाणले. एअरटेलने जिओच्या ऑफरनंतर २४४ रूपयांपासून ते १ हजार १९८ रूपयांपर्यंतचे प्लॅन्स बाजारात आणले. त्यानंतर आता ग्राहकांसाठी देशातील तिसरी मोठी कंपनी आयडिया सेल्युलरने आकर्षक ऑफर आणली असून आता आयडिया त्यांच्या ग्राहकांसाठी दररोज १.५ जीबी ४जी डेटा प्लॅन घेऊन आली आली आहे. या प्लॅनची वैधता ही ७० दिवसांसाठी असणार आहे.

४९९ रूपये ऐवढी आयडियाच्या या नव्या प्लॅनची किंमत असून ग्राहकांना या प्लॅननुसार ७० दिवसांसाठी दररोज १.५ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. सोबतच आयडिया टू आयडिया अनलिमिटेड कॉलिंग आहे, तर दुस-या नेटवर्कसाठी ३ हजार मिनिटांची फ्री कॉलिंग असेल. प्लॅनचा कालावधी हा ७० दिवसांसाठी असेल. दुस-या नेटवर्कवर ३ हजार मिनिटे पूर्ण झाल्यावर स्टॅंडर्ड रेट्स अप्लाय केले जातील. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन आयडियाच्या काही मोजक्याच ग्राहकांसाठी आहे. ज्या ग्राहकांना या प्लॅनचे मेसेज आले आहेत त्यांनाच ही सेवा दिली जाणार आहे.

Leave a Comment