‘ट्विटर’वर ‘ब्लूमबर्ग न्यूज’सह अनेक ‘लाईव्ह’ प्रक्षेपण सेवा


नेटकरांना आकर्षित करण्यासाठी १२ नव्या सुविधांचा समावेश

सॅन फ्रॅन्सिस्को: नेटकरांना अधिक प्रमाणात आकर्षित करून घेण्यासाठी ‘ट्विटर’वर ‘ब्लूमबर्ग न्यूज’, महिला बास्केटबॉल लीग ‘डब्ल्यूएनबीए’चे सामने, विविध नवीन उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती करून देणारे कार्यक्रम; यांच्यासह एकूण १२ प्रकारचे कार्यक्रम ‘लाईव्ह’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय जाहीर होताच शेअर बाजारात ट्विटरच्या समभागांच्या किंमतीने ६. ४ टक्क्यांनी उसळी घेतली.

‘ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग’ क्षेत्रात आघाडी पटकाविण्यासाठी ट्विटरने कंबर कसली असून त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने आपल्या सेवांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क येथे डिजीटल ट्रेंड ग्रुप ‘इंटरऍक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग ब्यूरो’ने आयोजित केलेल्या परिषदेत या संबंधीची योजना ‘ट्विटर’ने सादर केली.

महिला बास्केटबॉल लीग स्पर्धांच्या हंगामात दर आठवड्याला सामान्यांचे प्रक्षेपण ‘ट्विटर’ अकाऊंट धारकांना पाहता येणार आहे. त्यासाठी ‘डब्ल्यूएनबीए’बरोबर सन २०१७ ते १९ या ३ हंगामासाठी करार करणार आल्याचे ‘ट्विटर’ने जाहीर केले आहे. या शिवाय बेसबॉल, गोल्फ अशा क्रीडाप्रकारांच्या महत्वाच्या स्पर्धा ट्विटरवर पाहता येणार आहेत.

‘लाईव्ह नेशन एंटरटेनमेंट’च्या सहकार्याने ट्विटरवर अनेक महत्वाच्या संगीतविषयक कार्यक्रमांचे प्रक्षेपण होणार आहे. त्यामध्ये याच महिन्यात होणाऱ्या ‘ग्रॅनी’विजेता ‘झॅक ब्राऊन बँड’च्या लाईव्ह कॉन्सर्टचाही समावेश असणार आहे. शेअर बाजारात रस असणाऱ्या नेटकरांसाठी ‘ओपनिंग बेल’ हा कार्यक्रम दररोज प्रक्षेपित केला जाणार आहे.

Leave a Comment