पोर्शेच्या कयान एस डिझेलने खेचले वजनदार प्रवासी विमान


जर्मन ऑटो मेकर पोर्शेने त्यांच्या मिडसाईज लग्झरी क्रॉस ओव्हर कयान एस डिझेलने फ्रान्स एअरलाईन्सचे सर्वात वजनदार प्रवासी विमान खेचून गिनेज बुकमध्ये नांव नोंदविले आहे. या निमित्ताने कयान एस डिझेल मॉडेलच्या इंजिनाची पॉवर सिद्ध झाली असल्याचे व ही कार एक सर्वत्तम खरेदी ठरेल असे कंपनीच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या कारला ४.२ लिटर व्ही एट टर्बो डिझेल इंजिन दिले गेले आहे. ५.४ सेकंदात ही कार ६२ मैल पर अवर इतका वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड आहे २५२ मैल. बाहेरून मोठी असणारी ही कार आतूनही तितकीच प्रशस्त आहे. तिला सहा एअरबॅग्ज, एबीएस, इलेक्ट्राॅनिक्स ब्रेक्स, ट्रॅक्शन कंटोलसह दिले गेले आहेत. ७ इंची इनफोटेन्मेंट, सॅटेलाईट नेव्हीगेशन, ब्ल्यू टूथ अशा अन्य सुविधा असून ती अर्बन मेटॅलिक, ब्लॅक, कॅरानिम रेड, क्लासिक सिल्व्हर, व्हाईट अशा रंगात उपलब्ध आहे. या पॉवरफुल कारची किमत आहे १ कोटी ४ लाख रूपये.

Leave a Comment