पुणे कुटुंब न्यायालयाने स्काईपवरून मान्य केला घटस्फोट


पुण्यातील कुटुंब न्यायालयाने न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच स्काईपवरून घटस्फोट देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी पती सिंगापूरहून भारतात आला होता मात्र त्याच्या पत्नीला कंपनीच्या नियमांप्रमाणे लंडनहून येथे येणे शक्य झाले नाही. ही अडचण लक्षात घेऊन व दोघांचा सेपरेशन पिरीयड पूर्ण झाल्याची खात्री करून अखेर स्काईपच्या सहाय्याने सुनावणी करून न्यायालयाने त्यांना घटस्फोट मान्य केला. परस्पर सहमतीने हा घटस्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याचा विवाह ९ मे २०१५ रोजी झाला होता. मात्र विवाहानंतर दोघांनाही परदेशी जाण्याची संधी आली. पैकी पती सिंगापूरला गेला मात्र पत्नी पुण्यातच राहिली. अखेर आपल्या लग्नामुळे आपल्या करियरमध्ये बाधा येत आहे हे लक्षात येताच पत्नीने लंडनला प्रयाण केले व त्यानंतर दोघांनी परस्पर सहमतीने १२ ऑगस्ट २०१६ ला घटस्फोटासाठी दावा दाखल केला. दोघे त्यापूर्वीपासूनच वेगळे रहात होते. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने न्यायाधीशांनी पत्त्नीचे म्हणणे ऐकून घेतले व त्या दोघांचा सेपरेशन पिरीयड पूर्ण झाल्याचे मान्य करून घटस्फोटाची परवानगी दिली.

Leave a Comment