अॅपलचे भारतात पहिले ऑनलाईन स्टोअर लवकरच


अॅपलने भारतात त्यांचे पहिले ऑनलाईन स्टोअर या वर्षअखेर सुरू केले जात असल्याचे संकेत दिले आहेत.यामुळे अॅपलच्या स्थानिक उत्पादनांना देशात थेट ऑनलाईन उपस्थिती शक्य होणार आहे. सुरवातीला या स्टोअरमधून आयफोन एसईची विक्री केली जाईल. कारण या फोनचे उत्पादन भारतातच केले जात आहे. त्यानंतर भारतात उत्पादित केली जाणारी अॅपलची अन्य मॉडेल्सही येथे उपलब्ध होतील.

ऑनलाईन स्टोअर्ससाठी एफडीआय मंजूरी घेण्याची आवश्यकता भासणार नाही कारण भारत सरकारने स्थानिक उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीला अगोदरच परवागी दिली आहे. अॅपलने १७ जुलैपासून बंगलोर येथील असेंब्ली युंनिट सुरू होत असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे साधारण दिवाळीच्या आसपास त्यांचे ऑनलाईन स्टोअर सुरू होईल अशी अपेक्षा आहे. भारतात आयफोनची ५० टक्के विक्री ऑनलाईनवरच झाली असून संपूर्ण स्मार्टफोन इंडस्ट्रीची ऑनलाईन विक्री ३० टक्के आहे.

Leave a Comment