होंडा अॅक्टीव्हा आय चे फिमेल व्हर्जन आले


होंडाने त्यांच्या सर्वाधिक खपाच्या अॅक्टीव्हा चे फिमेल व्हर्जन अॅक्टीव्हा आय सादर केले आहे. ही स्कूटर बीएस चार नॉर्म्स इंजिनसह लाँच केली गेली असून तिची किंमत आहे ४७९१३ रूपये. ड्यूल कलर, ऑटो हेडलँप अशी फिचर्स दिली गेली असून पहिल्या मॉडेलच्या तुलनेत ती अधिक देखणी बनविली गेली आहे.

या स्कूटरला १८ लिटर अंडरस्टोरेज, चार्जिंग पोर्ट, १०९.१९ सीसीचे एअरकूल्ड इंजिन, व्ही मॅटिक ट्रान्समिशनसह गियर बॉक्स दिला गेला आहे. पहिली अॅक्टीव्हा आय नुकतीच लाँच केल्यानंतर लगेचच हे फिमेल व्हर्जन कंपनीने लाँच केले आहे. भारतातील ही दोन नंबरची टू व्हिलर कंपनी जगात १.५ कोटी स्कूटर्स विकून रेकॉर्ड नोंदविणारी कंपनी ठरली आहे. अॅक्टीव्हा हा कंपनीचे फ्लॅगशीप मॉडेल आहे.

Leave a Comment