शेतकर्‍यांना लखपती बनण्यासाठी टाटा सन्सचा हात


टाटा ट्रस्टने दोन वर्षापूर्वी झारखंड, गुजराथ, महाराष्ट्र व ओरिसा या चार राज्यातील विविध जमातीच्या शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या लखपती शेतकरी योजनेला आलेले यश आता दृष्टीक्षेपात येऊ लागले असून या चार राज्यांच्या ४५० गावातील १ लाखांहून अधिक कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. २०२० पर्यंत आठ राज्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचाही फायदा लक्षावधी गरीब शेतकरी कुंटुंबाना होणार आहे असे या प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी गणेश नीलम यांनी सांगितले.

टाटा ट्रस्ट ही योजना संबंधित राज्यसरकारांच्या सहकार्याने राबवित आहे. त्यात शेतकर्‍यांना अधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या पिकांसंदंर्भात माहिती व आवश्यक प्रशिक्षण दिले जाते व त्यासाठी मदत दिली जाते. पाच वर्षांसाठी हे मिशन ट्रस्टने हाती घेतले आहे. या गरीब शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम ५० हजारांपर्यंत होते ते आता लाखांवर गेले आहे. गरीबीतून बाहेर पडून या शेतकर्‍यांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी ही योजना मदतगार बनत आहे.

Leave a Comment