कॅन्सरपिडीतांसांठी मदत गोळा करणार हुंडाईची कॉन्टॅक्टलेस कार


ह्युंडाईने त्यांची पहिली कॉन्टॅक्टलेस कार सादर केली असून ही कार कॅन्सरपिडीतांसाठी मदत गोळा करण्याचे काम करणार आहे. जगातील ही या प्रकारची पहिलीच कार आहे. या कारला पाच कॉन्टॅक्टलेस पेमेंट पॉईंटस असून लोक आपल्या इच्छेनुसार त्यात पैसे भरू शकणार आहेत. या प्रकारचे तंत्रज्ञान हुंडाई त्यांच्या अन्य कोणत्याही कारसाठी वापरणार नसल्याचा खुलासाही कंपनीने केला आहे.

या कारमधील पेमेंट पाईंटवर लोक पैसे डोनेट करतील तेव्हा त्यांना ऑडिओच्या माध्यमातून धन्यवाद दिले जातील तसेच त्यांनी दान केलेली रक्कम कारची नंबर प्लेट असते तेथे दिसले. यात फोटो बूथही आहे. दान केल्याबरोबर संबंधिताचा फोटो कारच्या एक्स्टेरियरवर लगेच दिसेल. किंग क्रॉस स्टेशनवर ही कार मे मध्ये उभी राहील व त्यांनतर नोव्हेंबरपर्यंत ती युकेमध्ये विविध ठिकाणी रोड शो करेल,.

कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानाचा वापर जग्वारने त्यांच्या मॉडेल एफ पेस व एक्सई मध्ये केला आहे. यात चालक इनफोटेनमेंट सिस्टीमचा वापर करून पेट्रोल वा अन्य बिले भरू शकतो.

Leave a Comment