इंटरनेटवर हिंदी भाषेचे वर्चस्व


इंटरनेटवर हिंदी भाषेचे वर्चस्व दिवसेनदिवस वाढत चालले असून २०२१ पर्यंत हिंदी इंग्रजीला पछाडून इंटरनेटवर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा म्हणून उभरून येईल असे गुगलच्या केपीएमजीच्या अहवालात नमूद केले गेले आहे. या अहवालानुसार २०२१ पर्यंत ५३.६ कोटी लोक इंटरनेटवर त्यांच्या प्रादेशिक भाषांचा वापर करतील. अर्थात याचे मोठे श्रेय मोबाईल इंटरनेटचा वाढता वापर व डेटा पॅकसाठी घटलेले दर यांच्याकडे असल्याचेही यात म्हटले गेले आहे.

२०२१ पर्यंत हिंदीतून इंटरनेटचा वापर सर्वाधिक म्हणजे १९.९ कोटींवर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. भारतात त्या काळापर्यंत इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या ७३.५ कोटींवर असेल. २०१६ मध्ये हा आकडा ४०.९ कोटी होता. भारतीय भाषांतून इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या आत्ताच मोठी आहे. पूर्वीपासूनच सरकारी सेवा, क्लासिफाईड्स, बातम्या यासाठी प्रादेशिक भाषांतून वापर होत आहेच पण चॅट अॅप व डिजिटल मनोरंजनाबरोबरच आता भारतीय युजर डिजिटल देणीही इंटरनेटच्या माध्यमातून देऊ लागले आहेत. हिंदी, मराठी, बंगाली, तमीळ, कन्नड, तेलगू भाषेत इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे.

Leave a Comment