सरकारची पीएफ व्याजदराला मंजुरी


नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून २०१६-१७या आर्थिक वर्षासाठी ईपीएफमधील निधीवर ८.६५ टक्के व्याजदरास मंजुरी देण्यात आली. सदस्यांच्या खात्यात लवकरच हे व्याज जमा करण्यात येईल. आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना सदस्यांच्या खात्यात ८.६५ टक्क्याने व्याज जमा करण्यास कर्मचारी निर्वाहनिधी संघटनेने सांगितले आहे. या महिन्याच्या प्रारंभी कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी अर्थ मंत्रालयाने २०१६-१७ साठी ईपीएफवर ८.६५ टक्क्यांनी व्याज देण्यास मंजुरी दिल्याचे म्हटले होते. औपचारिक क्षेत्रातील कर्मचा-यांना गेल्या डिसेंबरमध्ये ईपीएफकडून मंजूर करण्यात आलेल्या ८.६५ टक्के व्याजाच्या तुलनेत कमी व्याज देण्यात येईल अशी शंका होती.

Leave a Comment