आता घ्या फुकट आणि घरपोच… पण काय


देशात आता मोफत वाटले जाणार कंडोम
नवी दिल्ली: एड्स हेल्थ केअर फाउन्डेशन यांच्या वतीने (एएचएफ) भारतातील एड्सचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंडोम मोफत देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. फ्री कंडोम देणारे हे भारतातील पहिळे सेंटर आहे. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार भारतातील २.१ मिलियन लोक एचआयव्ही-एड्स बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत तिस-या क्रमांकावर आहे.

दरम्यान, एड्स हेल्थ केअर फाउन्डेशन या संस्थेकडून हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लव्ह कंडोम, या नावाने मोफत कंडोम देण्याचा उपक्रम बुधवारपासून सुरु करण्यात आला आहे. सार्वजनिक स्तरावर पहिल्यांदाच मोफत कंडोम देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्त प्रभाव असलेल्या भागात सरकारकडून मोफत कंडोम पुरवठा करण्यात आला. या संस्थेकडून फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून कंडोमची ऑर्डर स्वीकारली जाईल आणि ती घरापर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येईल, असे एएचएफने म्हटले आहे.

सरकारकडून रेल्वे स्टेशनवर अल्प दरात व्हेंडिंग मशिन्सच्या माध्यमातून कंडोमची विक्री करण्यात आली. मात्र, त्या मशिन्सची तोडफोड करण्यात आली. खरं तर अशा व्हेंडिंग मशिन्स भारतात कधीच काम करु शकत नाहीत. लोक कंडोमसाठी पैसे देण्यास नकार देतात, असे या संस्थेचे व्ही सॅम प्रसाद यांनी सांगितले.