फेसबुक भारतीय युजर्ससाठी आणणार नवे फिचर्स


फेसबुकवर सतत सक्रीय असलेल्या युजर्सना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न फेसबुकने केला असून खास भारतीय युजर्ससाठी आता फेसबुक नवे फिचर्स आणणार असून ‘लोकल कॅमेरा इफेफ्ट’ असे या फिचरचे नाव आहे. तुम्हाला फेसबुकवर फोटो अपलोड करताना वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स आणि इफेक्ट दिसतात. पण फेसबुकने आणलेले हे फिचर फक्त भारतीयांसाठी असल्यामुळे भारतीय युजर्स आपल्या भौगलिक प्रदेशानुसार आपल्या प्रोफाइल्स फ्रेम्स वापरू शकतात.

विशेष म्हणजे फेसबुकने मुंबई, दिल्ली शहरांसाठी आणि गोव्यासाठी हटके फ्रेम्स तयार केल्या आहेत. तेव्हा दिल्लीवाले, मुंबईकर आणि गोवेकर आपापल्या शहर, राज्यांप्रमाणे फेम्स वापरू शकतात. अर्वरित भारतीयांसाठी काही कॉमन फ्रेम्सही तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित भारतीयांसाठी काही कॉमन फ्रेम्सही तयार करण्यात आल्या आहेत. फेसबुक अॅप आणि मेसेंजर या दोन्ही ठिकाणी हे फिचर उपलब्ध असणार आहे.

तसेच आता ‘रिअॅक्शन’चे बटन देखील फेसबुक लाइट युजर्ससाठी लाईकबरोबर दिले आहे. अपेक्षेप्रमाणे वेगवान भारतात इंटरनेटचा स्पीड नाही किंवा काही ठिकाणी नेटवर्कचीही अडचण येते. फेसबुकने तेव्हा भारतीय युजर्ससाठी ‘फेसबुक लाइट’ अॅप लाँच केले होते. या फेसबुक लाइट वापरणाऱ्या युजर्ससाठी लाइकबरोबर रिअॅक्शनचा पर्यायही दिला आहे. फेसबुकच्या रिअॅक्शन बटणला युजर्सची खूप चांगली पसंती मिळाली होती. त्याचप्रमाणे फेसबुकवर असलेल्या ग्रुपवर देखील फेसबुक अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर अदित वैद्य यांनी एका वेबसाइटला सांगितले.

Leave a Comment