५ व १० रूपयांची नवी नाणी लवकरच


रिझर्व्ह बँकेने ५ व १० रूपये किंमतीची नवी नाणी चलनात आणण्यास मंजुर दिली असून ही नाणी लवकरच बाजारात उपलब्ध हेतील असे समजते. राष्ट्रीय अभिलेखागार च्या १२५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्ताने ही नवी नाणी काढली जात आहेत. अर्थात नवी नाणी आली तरी जुनी नाणी चलनात राहणार आहेत.

देशात सध्या १० रूपयाच्या नाण्याच्या वैधतेसंबंधी नागरिकांत भ्रम आहे. कांही जणांच्या मते १० रूपयांची कांही नाणी बनावट आहेत. ज्या नाण्यात १० आकडा खालच्या बाजूस आहे ते नाणे वैध आहे असेही सांगितले जाते. मात्र रिझर्व्ह बँकेने सध्या चलनात असलेली १० रूपयांची सर्व नाणी वैध असल्याचा खुलासा यापूर्वीच केला आहे.

Leave a Comment