सॅनिटायझर वापरताय? मग हे जरूर वाचा


आजकाल घराबाहेर कुठेही म्हणजे रिझॉर्ट, जिम, हॉटेल्स, कार्यालये, आफिसेस अशा अनेक ठिकाणी हात धुण्यासाठी लिक्वीड सोप किंवा सॅनिटायझर वापरला जातो. घराबाहेर कुठेही असताना पाणी उपलब्ध नसेल तर सॅनिटायझर जेलने हात स्वच्छ करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनात या जेलचा उपयोग फक्त मानसिक समाधान मिळण्यापुरता असून प्रत्यक्षात अशा सोपने अथवा सॅनिटायझरने हातावर फारसा प्रभाव पडत नाही. कांही वेळा तर त्यांचा उलटाच परिणाम होतो.

आजकाल जगभरातील सर्व देशांत सॅनिटायझर लोकप्रिय आहेत व त्यांची विक्री झपाट्याने वाढते आहे. यात अल्कोहोलचा वापर ६० टक्के इतका असतो. त्यामुळे ते जादा प्रमाणात वापरले तर जंतू नष्ट होतात पण त्याचा कांही वेळा विपरित परिणामही होतो. हात स्वच्छ करताना हाताला किती धूळ व माती आहे त्यावर सॅनिटायझरचा हातांच्या स्वच्छतेवर होणारा परिणाम अवलंबून असतो. न्यूरोव्हायरस, सी डिफिसाईल यावर या सॅनिटायझरचा परिणाम होत नाही त्यापेक्षा साबण व पाणी वापरून हात अधिक स्वच्छ होऊ शकतात.

सॅनिटायझर्स अथवा लिक्विड सोपमध्ये टाईकोल्सन या द्रव्याचा वापर केला जातो. त्यामुळे अनेकदा असे सॅनिटायझर्स वारंवार वापरात आले तर हार्मोन्सच्या पातळीत बदल होऊ शकतात व त्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. लहान मुलांना यामुळे उलटीची भावना येऊ शकते असेही आढळले आहे.

Leave a Comment