शाओमीचा एमआय सिक्स भारतात नाहीच?


भारतातील शाओमी प्रेमीसाठी एक बुरी खबर आहे. शाओमीने त्यांचा एमआय सिक्स हा स्मार्टफोन नुकताच चीनच्या बाजारात सादर केला आहे. मात्र हा फोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे वृत्त इंडिया टुडेच्या टेक रिपोर्टमध्ये दिले गेले आहे. शाओमीने त्यांचे एमआय मी टू व एमआय नोट टू हे दोन प्रॉडक्टही गतवर्षीच चीनच्या बाजारात आणले मात्र भारतीय बाजारात ते आणले गेले नाहीत.

या मागे असे कारण दिले जात आहे की एमआय फाईव्हला भारतीय बाजारात फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कारण या फोनचे हायरएंड व्हेरिएशन भारतात आणले गेले नाही तर भारतातील ग्राहकांच्या मानसिकतेप्रमाणे परवडणार्‍या किमतीतील मॉडेल्सच भारतात आणली गेली. यामुळे कंपनीवर टीकाही झाली व कंपनीच्या प्रमुख ह्युगो बरा यांनी कंपनीचा हा निर्णय चुकीचा होता असे कबूलही केले.

तरीही कंपनीला त्यांचा फ्लॅगशीप भारतात सादर करणे महागात जाणार आहे. या फोनला चीनमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे.२८ एप्रिलपासून त्याची प्रत्यक्ष विक्री होत असली तरी आत्ताच १० लाख ग्राहकांनी त्यासाठी पूर्वनोंदणी केली आहे. या फोनला ५.१५ इंची फुल एचडी, स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ६ जीबी रॅम, अँड्राईड नगेट ७.१.१, १२ एमपीचे दोन ड्युअल रियर कॅमेरे, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून तो ६४ व १२८ जीबी इंटरनल मेमरीसह उपलब्ध आहे.

Leave a Comment