२०३० पर्यंत मलेरियामुक्त होणार भारत


लंडन – १९ देशांच्या एका गटाने जागतिक मलेरिया दिनानिमित्त म्हटले आहे की, २०३० पर्यंत आशिया-प्रशांत भूक्षेत्रात मलेरिया कायमचा हद्दपार होऊ शकतो. आशिया पॅसिफिक लिडर्स मलेरिया अलायन्स (अपलमा) संघटनेने म्हटले की, भारतात २०१५ मध्ये मलेरिया रोगांची लागण १.३ कोटी रुग्णांना झाली. २४,००० हून अधिक रुग्णांचा यामध्ये मलेरियामुळे मृत्यू झाला. मलेरिया अहवाल -२०१६ अनुसार जागतिक आरोग्य संघटनेने भारतात मलेरिया रोगामुळे आरोग्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. देशातील १४ टक्के लोकसंख्या म्हणजेच १८.४ कोटी नागरिकांना मलेरियाचा प्रादूर्भाव होण्याची सर्वाधिक भीती आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment