मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात सध्या ४जी इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली असून त्यात आता आपल्या पोस्टपेड ग्राहकांना ३६जीबी ४जी डेटा व्होडाफोन फ्री देणार आहे. ग्राहकांना हा डेटा १२ महिन्यांसाठी वापरता येईल. याचबरोबर व्होडाफोन ९जीबी डेटा तीन महिन्यांसाठी फ्री देणार आहे.
व्होडाफोन देणार ३६जीबी ४जी फ्री डेटा
व्होडाफोनच्या वेबसाईटवर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना जाऊन मोबाईल नंबर टाईप करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी नंबर येईल. हा ओटीपी नंबर वेबसाईटवर टाकल्यानंतर तुमच्या या ऑफरला सुरुवात होणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक व्होडाफोनचा रेड अनलिमिटेड प्लॅन वापरणारा असला पाहिजे. म्हणजेच व्होडाफोनच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला ३जीबी + ९जीबी डेटा मिळेल. ६९९ रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये ग्राहकाला ५जीबी + ९जीबी इंटरनेट डेटा मिळेल.