मुंबई : एक लाख अधिक मोबाईल टॉवर रिलायन्स जिओने नेटवर्क क्षमतेत वाढ करण्यासाठी उभारण्याचा उद्देश ठेवला असून जिओच्या नेटवर्कची क्षमता या नवीन टॉवरमुळे दुप्पट होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
जिओच्या नेटवर्कची क्षमता दुप्पट होणार !
रिलायन्स जिओचे मार्च अखेरपर्यंत १० कोटी ८९ लाख ग्राहक आहेत. प्रत्येक महिन्याला ११० कोटी गीगाबाईट इतके इंटरनेट ट्रॅफिक जिओवर आहे. तर २२० कोटी व्हॉईस आणि व्हिडिओ मिनिट प्रति दिवस असा जिओचा वापर होतो. रिलायन्स जिओच्या दाव्यानुसार भविष्याचा विचार करून प्रकल्प तयार केल्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने ५ जी लॉन्च करणे शक्य होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. लवकरच फायबर टू होम (एफटीटीएच) या सेवेसाठी रिलायन्स काही ठिकाणी प्रकल्पही सुरू करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.