होंडाने आणली BS-IV इंजिनसह ऍक्टिवा आय


नवीन ऍक्टिवा-आय स्कूटर होंडा मोटारसायकल आणि स्कूटरने लॉन्च केली असून ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन फिचर असलेल्या अॅक्टिवाचे इंजिन भारत-फोर (BS-IV) प्रकारातील आहे. ४७,९१३ रुपये इतकी नव्या ऍक्टिवा-आय स्कूटरची किंमत असून ड्युअल डोन कलर ऑप्शनमध्ये ऍक्टिवा-आय उपलब्ध असणार आहे. या नव्या स्कूटरसमोर ऑटोमॅटिक स्कूटर वर्गातील ‘ऍक्टिवा’चा दबदबा कायम राखण्याचे आव्हान असेल.

ऍक्टिवा-आय स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे कमी वजनाचे आणि जास्त क्षमतेचे इंजिन आहे. नव्या ऍक्टिवामधील इंजिनची क्षमता ११० सीसी (होंडा इको टेक्नॉलॉजी) असेल. व्ही मॅटिक गियरबॉक्स ऍक्टिवा आयचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नव्या स्कूटरचा टॉप स्पीड ८३ किलोमीटर प्रतितास इतका आहे. ऍक्टिवा आयचे वजन १०३ किलो आहे.

कॉम्बी ब्रेक सिस्टमसह मोबाईल चार्जिंग सॉकेटची सोय ऍक्टिवा आयमध्ये उपलब्ध आहे. ऍक्टिवा आयचे टायर्स ट्युबलेस आहेत. स्कूटरच्या सीटखाली असणाऱ्या पेट्रोल टाकीची क्षमता १८ लीटर इतकी आहे. आर्किड पर्पल मेटॅलिक, लश मजेंटा मेटॅलिक, निओ ऑरेंज मेटॅलिक, ब्लॅक आणि इम्पिरियल रेड मेटॅलिक अशा पाच रंगांमध्ये अॅक्टिवा आय उपलब्ध आहे.

Leave a Comment