आता व्हॉट्सअॅप ऐकवणार चॅट मेसेजेस


नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप आता तुम्हाला येणारे मेसेजेस बोलूण ऐकविणार असून ही सुविधा सध्या केवळ आयफोन यूझर्ससाठी असली तरी लवकरच संपूर्ण व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी ही उपलब्ध होणार आहे. तुम्ही या सुविधेमुळे व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर आयफोनमधील सिरीच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेजेस ऐकायला मिळणार आहेत.

८९ एमबीचे व्हॉट्सअॅपचे नवे व्हर्जन असून ज्यामध्ये ४ नवे अपडेट्स जोडले गेलेले आहेत. या व्हर्जनमध्ये सिरीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप मेसेजेस यूझर्सला बोलून दाखविण्यात येणार आहेत. यासोबतत फोन कॉल्स टॅब, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि ग्रुप इन्फॉर्मेशन हे सर्व स्टेट्स एकत्रित पहायला मिळणार आहेत.

आयफोनमधील सिरी सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअॅपच्या आधीपासूनच इतर मेसेजेस सेंड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, आता नव्या व्हर्जनमध्ये सिरी तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज वाचून दाखविणार आहे. सिरीमध्ये आता ड्रायव्हिंग दरम्यान वापरण्यात येणा-या हँड्स फ्री सपोर्टचे फिचरही लवकरच उपलब्ध होणार आहे.

मेसेज ऑडिओ फिचरनंतर आता फोनमध्ये अधिकतर मेसेजेस अनरीड होणार आहेत. कारण, आता Hey Siri, read my last WhatsApp message असे म्हणताच सिरी तुमच्या आदेशाचे पालन करत मेसेज वाचून दाखविणार आहे. एवढेच नाही तर तुम्ही सिरीला कमांड देवून त्या मेसेजला रिप्लायही करु शकणार आहात.

सध्या केवळ आयफोन यूझर्ससाठीच ही सुविधा उपल्बध आहे. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचे हँडसेट iOS 10.3+ व्हर्जनने अपडेट करावे लागणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये पारशी भाषेचेही ऑप्शन देण्यात आले आहे.

Leave a Comment