बांग्ला युद्धातील स्वातंत्रसैनिकांना ५ वर्षाचा भारतीय व्हिसा


नुकत्याच भारत भेटीवर आलेल्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या दौर्‍यात १९७१ च्या बांग्ला पाक युद्धात सामील झालेल्या बांग्ला स्वातंत्रसैनिकांना भारताचा पाच वर्षाचा मल्टीएन्ट्री व्हिसा देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारपासून असा व्हिसा देण्याच्या कामाला सुरवात झाली असून भारत बांग्ला देशातील विशेष संबंधांची ओळख म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.

या व्हिसानुसार बांग्ला युद्धातील ६५ वर्षांवरील स्वातंत्रसैनिक भारतातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊ शकणार आहेत. अर्थात व्हीसासाठी अर्ज करताना त्यांना अन्य आवश्यक कागदपत्रांसोबत स्वातंत्रसैनिक असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. बांग्ला देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात बांग्लादेशच्या जवानांनी व भारतीय सैनिकांनी खांद्याला खांदा लावून शौर्य गाजविताना पाकिस्तानचा पराभव केला होता.

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत भेटीवर असताना भारतीय स्वातंत्रसैनिकांचा सन्मान केला व आमच्या देशातील सर्व पिढ्या तुमची आठवण ठेवतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी दरवर्षी १०० बांग्ला स्वातंत्र्यसैनिक भारतीय रूग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतील अशी घोषणा केली.

Leave a Comment