आता रस्ते देणार हॉर्न वाजविण्याचा इशारा


जगात वाहन क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत व कारसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहनां पाठोपाठ आता त्यांचा अत्यावश्यक भाग हॉर्नबाबतही अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. भारतात हायवे सुरक्षेत वाढ करण्यासाठी विकसित केलेल्या या सिस्टीमच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या नुसार वाहन चालकाला रस्त्यांवरील पोल, हॉर्न वाजविण्यासारखी परिस्थिती असेल तर तशी सूचना देत आहेत.

एचपी ल्यूब्रिकंटस व लिथो बार्नेट यांनी परस्पर सहकार्याने एक सिस्टीम विकसित केली आहे. जम्मू श्रीनगर या देशातील सर्वात अवघड व धोकादायक हायवेवर खास पोल बसविले गेले आहेत. या रस्त्यावरील धोकादायक वळणांवर हे स्मार्टलाईफ पोल बसविले गेले आहेत. ते एकमेकांशी वायरलेस तंत्रज्ञानाने जोडले गेले आहेत. रस्त्यावरच्या धोकादायक वळणांवर वाहने थोडी इकडेतिकडे होत असतील तर पोलवर त्याचा अॅलर्ट मिळतो. हे पोल वाहनांचा वेग मापतात व चालकाला हॉर्न देण्यासाठी अॅलर्ट देतात. या सिस्टीमच्या चाचण्या अत्यंत यशस्वी झाल्या असून त्यामुळे या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झल्याचे दिसून आले आहे. आता अन्य धोकादायक महामार्गांवरही असे पोल बसविले जाणार आहेत.

रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होणार्‍या जगातील कांही देशात भारताचाही समावेश आहे. भारतात पहाडी भागात हे प्रकार होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून २०१५ मध्ये १लाख ४० हजार लोक रस्ते अपघातात प्राणास मुकले आहेत.

Leave a Comment