मस्तानम्मा- १०६ वर्षांची लोकप्रिय यूट्यूबर


आंध्र प्रदेशातील १०६ वर्षे वयाची मस्तानम्मा जगातील सर्वात वयोवृद्ध यू ट्यूबर बनली असून तिला एखाद्या चित्रपट सेलिब्रिटीप्रमाणे लोकप्रियता मिळाली आहे. मस्तानम्मा यूट्यूब वर पारंपारीक भारतीय पदार्थ बनवून त्याचे व्हिडीओ अपलोड करते. तिच्या या रेसिपी लोकांना खूपच भावत आहेत. तिचे हे व्हिडीओ कंट्री फूड नावाने प्रसिद्ध आहेत. तिला चॅनलवर नानी अम्मा म्हणूनही ओळखले जाते.

मस्तानम्माच्या चॅनलला दोन लाखांहून अधिक लोकांनी सबस्क्राईब केले आहे. तिचे विविध पदार्थांचे ११७ व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ दोन कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. मस्तानम्मा नैसर्गिक वातावरणात पदार्थ बनविते व तिचा नातू त्याचे व्हिडीओ बनवितो. फिश डिश व अंडा डोसा हे तिचे पदार्थ खूपच लोकप्रिय ठरले आहेत.

Leave a Comment