होंडाचे २० टक्के व्यवसायवाढीचे ध्येय


भारतातील दोन नंबरची मोटसायकल व स्कूटर उत्पादक कंपनी होंडा इंडियाने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी २० टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले असून ६० लाख वाहन विक्रीचे उदिष्ट्य ठरविले आहे. कंपनीचे प्रमुख निमास काटो यांनी ही माहिती दिली.

काटो म्हणाले गतवर्षी आम्ही भारतात ५० लाख वाहने विकून रेकॉर्ड नोंदविले आहे. आमच्या व्यवसायात गतवर्षी १२ टक्के वाढ झाली. नोव्हेंबर डिसेंबरची नोटबंदी व त्यानंतर २९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने बीएस ३ वाहन विक्रीला केलेली बंदी असे दोन जबरदस्त तडाखे सहन करूनही आम्ही व्यवसायात वाढ नेांदविली आहे.यंदा २० टक्के व्यवसायवाढीचे ध्येय ठरविले गेले आहे.

कंपनी उदिष्यपूर्तीसाठी दोन नव्या बाईक्स व दोन स्कूटर्स बाजारात आणणार आहे. या वर्षीच्या जुलैपर्यंत कर्नाटकात कंपनीची चौथी असेंब्ली लाईन सुरू होत असून त्यामुळे उत्पादनाची क्षमता ६० हजारांना वाढणार आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये १ हजार सीसी स्पोर्टस बाईक अफ्रिका ट्वीन बाजारात आणली जात आहे. होंडासाठी भारत हे सर्वात मोठे मार्केट असून त्यांचा बाजारातील हिस्सा ३० टक्के आहे.

Leave a Comment