या प्रसिद्ध शहरांच्या अस्तित्त्वाचे पुरावे नाहीत


इतिहासात अशी अनेक शहरे आहेत जी, शतकानुशतके त्यांच्याशी संबंधित असलेल्या कथांमधून अजरामर झाली आहेत. मात्र ती प्रत्यक्षात कुणी पाहिलेली नाहीत अथवा त्यांच्या अस्तित्त्वाचे पुरावेही मिळालेले नाहीत. यातील अनेक शहरांवर अनेक कथा, कादंबर्‍या लिहिल्या गेल्या, अनेक चित्रपट निघाले व आजही या शहरांबाबतच्या दंतकथा ऐकविल्या जात आहेत. त्यातील काही शहरांची ही ओळख

सिटी ऑफ ट्राॅय- या शहरांसंबंधी प्रचलित असलेल्या कथांनुसार हे तुर्कस्तानातील प्रसिद्ध शहर, ग्रीस कथेनुसार शत्रूंपासून या शहराचा बचाव व्हावा म्हणून पॉसिडॉन व अपोलो या देवतांनी या शहराभोवती प्रचंड व मजबूत भिंत किवा तट बांधला होता. ३००० बीसीपूर्वीचे हे शहर अखेर शत्रूने प्रचंड लाकडी घोड्याच्या पोटातून सैनिक भरून शहरात घुसविले व शहर जिंकले अशी कथा सांगितली जाते. यावर अनेक सुंदर चित्रपटही आले आहेत.

सोडोम व गोमोराह- जेनेसिसच्या पुस्तकात तसेच कुराणात या शहरांचे उल्लेख आहेत. या दोन्ही सुंदर शहरांवर देवाचा कोप झाला व ही शहरे त्याने आगीत जाळून टाकली अशी कथा सांगितली जाते मात्र या शहरांच्या अस्तित्त्वाचेही कोणतेही पुरावे संशोधकांना मिळालेले नाहीत.


शंभाला- हिंदू पुराणात विष्णुच्या दशावतारांचा उल्लेख येतो. विष्णुचा दहावा अवतार कल्की या शहरात जन्मला असे मानले जाते. सिटी ऑफ लाईट या नावाने हे शहर ओळखले जाते व प्राचीन बौद्ध ग्रंथातही या शहराचे उल्लेख आहेत. बौद्धधर्मियांसाठी ही पवित्र नगरी आहे मात्र प्रत्यक्षात हे शहर कुणीच पाहिलेले नाही.

एल डोराडो सिटी ऑफ गोल्ड- स्पेनमधील हे शहर अनेक दंतकथातून जिवंत आहे. या शहराचा प्रमुख मुडस्का याने सोन्याने स्वतःचे शरीर मढवून घेतले व त्यासह सरोवरात समाधी घेतली असे सांगितले जाते. दक्षिण अमेरिका व अमेझॉनमधील अनेक संशोधकांनी या शहराच्या शोध घेण्याचा प्रयत्न अनेक वर्षे केला मात्र त्या शहराच्या अस्तित्त्वाचा एकही पुरावा त्यांना मिळू शकला नाही.

एटलांटिस- ग्रीसच्या प्राचीन कथांतून या शहराचे वर्णन येते. हे बेट होते व अनेक पुस्तकांत त्यांचा उल्लेख येतो. मात्र हे शहर काल्पनिक होते असा प्रवाद आहे. आजही हे शहर खरे की काल्पनिक यावर वाद झडत असतात.

Leave a Comment