गर्भवती असतानाच पुन्हा गर्भधारणा


मानवी इतिहासात दुर्मिळ समजली जाणारी घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. गेल्या १०० वर्षात या प्रकारच्या फक्त सहा घटना नेांदविल्या गेल्या आहेत. ब्रिटनमधील महिलेला जुळे होणार असल्याची कल्पना डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून अगोदरच दिली होती मात्र प्रत्यक्षात तिने एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही महिला गर्भवती असतानाच तिला पुन्हा गर्भधारणा झाली व त्यामुळे तिळे जन्माला आले आहे.

या विषयातील तज्ञ प्रो. सायमन फिशेल सांगतात एकदा गर्भवती राहिल्यानंतर पुन्हा गर्भधारणा सहसा होत नाही. मात्र काही दुर्मिळ केसमध्ये असा प्रकार घडू शकतो. मानवांच्या बाबतीत ही फारच दुर्मिळ घटना असते. महिला दोन आठवडे किंवा महिन्याची गर्भवती असताना पुन्हा तिला गर्भधारणा झाली तर त्याला सुपरफोएटेशन म्हटले जाते. १८६५ साली अशी पहिली केस नोंदविली गेली होती. त्यानंतर १०० वर्षांच्या काळात अशा सहा केसेस नोंदविल्या गेल्या आहेत. रोममधील एका महिलेला ती ३ ते चार महिन्यांची गर्भवती असताना पुन्हा गर्भधारणा झाल्याची नोंद आहे.

Leave a Comment