नव्या रूपात येणार मारूति सुझुकीची नवी स्विफ्ट डिझायर


आपली न्यू जनरेशनची ‘स्विफ्ट डिझायर’ ही शानदार कार लॉन्च करण्याची पूर्ण तयारी मारुती सुझुकीने केली असून कंपनीला या कारच्या जुन्या मॉडेलने मोठा फायदा करून दिला आहे. या कारचा भारतातील काही लोकप्रिय कार्समध्ये समावेश आहे. आपली नवीन कार ‘स्विफ्ट डिझायर’ चा लूक आणि फिचर्स नुकतेच कंपनीने उघड केले असून पुढील महिन्यात १६ मे रोजी ही कार भारतात लॉन्च होणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कंपनी या कारचे नाव बदलून स्विफ्ट ऎवजी डिझायर असे ठेवणार आहे. मारुती सुझुकीने स्विफ्ट डिझायरला पहिल्यांदा २००८मध्ये लॉन्च केले होते. आता येणारी कार स्विफ्ट डिझायर ही थर्ड जनरेशनची असेल. थर्ड जनरेशनच्या स्विफ्ट डिझायरच्या लूकमध्ये आकर्षक बदल करण्यात आला आहे. या कारच्या फ्रंटमध्ये मोठा बदल बघायला मिळतो. या नव्या डिझाईनमध्ये हेक्सागोनल ग्रिल दिले गेले आहेत. सोबतच टेललाइटलाही रिडिझाईन करण्यात आले आहे. या कारच्या इंटेरिअरमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. २०१७ स्विफ्ट डिझायरमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. कंपनीने यात अ‍ॅपल कार प्ले/अ‍ॅन्ड्रॉईड ऑटोसोबत ब्लूटूथ, यूएसबी, ऑक्स देण्यात येणार आहे. नव्या डिझाईनमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी DRLs, नवीन डिझाईन असलेले अलॉय आणि बाकी कॉस्मेटिक अपडेट्स दिले गेले आहेत. लीक झालेल्या फोटोंनुसार २०१७ स्विफ्ट डिझायर डार्क रेड, डार्क ब्लू आणि ब्राऊन कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment