सिलीकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपनी किटी हॉकने फ्लायर ही उडती कार बनविली असून ही कार उडत असतानाचे व्हीडीओ प्रसारित करण्यात आले आहेत यामुळे एकच धूम माजली असून एक्स्पर्ट सिमेरन मॉरिस यांनीही या फ्लाईंग कारची टेस्ट घेतली आहे. मॉरिस म्हणतो, ही कार उडविताना मला फारच मजा वाटली. यापूर्वी मी खेळातले हेलिकॉप्टरही कधी उडविलेले नाही मात्र ही कार शिकण्यासाठी मला कांही तासच सराव करावा लागला. ही अफलातून चीज आहे व ती उडविण्यासाठी परवाना असण्याची गरज भासणार नाही.
स्टार्टअप किटी हॉकने बनविली उडती कार
मॉरिस यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही ही कार उडविली.१०० टक्के इलेक्ट्रीक पॉवरवरची ही कार हेलिकॉप्टरप्रमाणे व्हर्टिकल उडते व तशीच लँड करते. व्हिडीओ गेम खेळताना कंट्रोल करायला जितका वेळ लागतो, तेवढ्यात वेळात ती शिकता येते. ८ रॉटर्सच्या मदतीने ती उडते व पाण्यातही उतरू शकते. २०१७ च्या अखेरी ही कार नवीन अवतारात सादर केली जाईल असे समजते.