रक्त फेकून देण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर


नवी दिल्ली : देशभरातील अनेकांना रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचे आपण ऐकत असतो, पण गरजू व्यक्तीला रक्त मिळावे हा दृष्टीकोनातून रक्तदान करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. देशभरातील अनेक रक्तदाते रक्तदान शिबीरात जाऊन पुण्यकर्म करतात. पण, रक्तदानानंतर निर्माण झालेले रक्त साठवण्याची यंत्रणा अपूरी असल्यामुळे लाखो लिटर रक्त कोणत्याही वापराविना फेकून द्यावे लागत आहे. मागच्या पाचवर्षात देशभरातील विविध ब्लड बँक्सना तब्बल ६ लाख लिटर म्हणजेच सुमारे ५३ टॅंकर केवळ रक्त साठवण्याच्या सुविधेअभावी रक्ताचे २८ लाख युनिटस फेकून द्यावे लागले आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडे चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पूढे आली आहे. रक्तसाठवण करणाऱ्या व्यवस्थेतील अनेक त्रूटी चेतन कोठारी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने पूढे आल्या आहेत. या माहितीतुन पूढे आलेली आणखी एक गंभीर बाब अशी की, देशभरात प्रतिवर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होत असते. तरीही देशात वर्षाकाठी सरासरी रक्ताच्या ३० युनिटची कमतरताच भासते हे वास्तव आहे. देशभरात प्रसुती, अपघात तसेच इतर अनेक कारणांमध्ये रक्त, प्लासमा, प्लेटलेटसच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड मोठे आहे. पण, साठवण व्यवस्थेतील अनागोंदी आणि त्रुटीमुळे लाखो लिटीर रक्त फेकून द्यावे लागत आहे. रक्त फेकून देण्यामध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत.

याबाबत प्राप्त माहितीनुसार ६.५७ लाख युनिट्स इतके रक्त २०१६-१७ या वर्षात फेकून द्यावे लागले. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे आहे की, जेथे वर्षाला १० लाख युनिट्सपेक्षाही अधिक रक्त जमा होते. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त जमा होऊनही केवळ साठवण क्षेमतेच्या अभावापायी हे रक्त वाया जाते. हे रक्त फेकून दिले जाते. ब्लड बँक आणि रुग्णालयांमध्ये ताळमेळ नसल्याने अनेकदा रूग्णाला आवश्यक त्या वेळी रक्त उपलब्ध होऊ शकत नसल्याच्याही घटना घडत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment