जिओ मे महिन्यात करणार मोठा धमाका


नवी दिल्ली : पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत रिलायन्स जिओ असून मीडिया रिपोर्टनुसार, आता केबल टीव्ही दुनियेतही प्रवेश करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी यांची कंपनी आहे. जिओकेअर डॉट नेटच्या रिपोर्टनुसार, लवकरच रिलायन्स जिओ डीटीएच सेवा सुरु करु शकते. दरम्यान, या बातमीला रिलायन्स जिओकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जिओची एकाच वेळेस ब्रॉडबँड सर्व्हिस आणि डीटीएच सेवा दोन्ही सुरु करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कंपनीने स्मार्ट सेट अप बॉक्ससोबत जिओ ब्रॉडबँड कनेक्शन देण्याचा विचार करत आहे.

Leave a Comment