रेल्वेच्या सर्व समस्यांसाठी एकच अॅप


नवी दिल्ली – रेल्वे सध्या रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने एका मोबाईल अॅपवर काम करत असून, जून महिन्यात हे अॅप वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

या अॅपवर प्रवाशांना रेल्वेच्या वेळा, रद्द झालेल्या फेऱ्या, तिकिटांचे आरक्षण, बर्थची उपलब्धता, प्लॅटफॉर्म क्रमांक अशी सर्वसमावेश माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंत कोणतीही माहिती प्रवाशांना वेळेत मिळत नव्हती; मात्र या अॅपद्वारे आता तेही शक्‍य होणार असून, प्रवाशांना त्यांच्या गाड्यांवर याद्वारे नजर ठेवता येणार आहे. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने प्रवाशांसमोरच्या अडचणी कमी होणार आहेत.

या अॅपचे नाव “हिंदीरेल’ ठेवण्याचा विचार सुरू असून, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या अॅपच्या निर्मितीमागे महसूल गोळा करणे हाही एक हेतू असून, या माध्यमातून रेल्वेला वर्षाकाठी 100 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असा अंदाज आहे.

Leave a Comment