अवघ्या ५३९० रुपयांमध्ये ४जी स्मार्टफोन


नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठे आपले स्वस्त मोबाइल फोन शाओमी कंपनीने लाँच केल्यानंतर सर्वच कंपन्यांमध्ये स्वस्त फोन उपलब्ध करुन देण्याची स्पर्धा सुरु झाली असून आता या स्पर्धेत आयटेल या मोबाइल कंपनीने आपला विश ए२१ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. केवळ ५३९० रुपये ऐवढी या स्मार्टफोनची किंमत असून याच सिरीजमध्ये आयटेल कंपनीने आपले it१५१८ आणि it१५२० हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे सर्व स्मार्टफोन ४जी VOLTE सपोर्टेबल आहेत.

या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ६.० मार्शमेलो, १जीबी रॅम, ८जीबी मेमरी स्टोरेज आणि १.३ GHz चा क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यासोबतच ४.५ इंचाचा डिस्पे, २००० mAh क्षमतेची बॅटरी, फ्लॅश लाइट, ५ मेगापिक्सेलचा रिअर आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल व्हॉट्सअॅप, ड्युअल इंस्टाग्राम आणि ड्युअल फेसबूक सुरु करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डर, फाइल शेअरिंगसाठी Xender, ब्ल्यूटूथ ४.०, वाय-फाय आणि जीपीएसची सुविधा आहे. या फोनसोबत युझर्सला चार्जर, हेडफोन, ३ लेयर स्क्रिन फिल्म, डेटा केबल आणि बॅक कव्हर मिळणार आहे.

Leave a Comment