विना बटणाचा एचटीसीचा यू स्माटफोन


तैवानच्या मोबाईल उत्पादन कंपनीने त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन एचटीसी यू नावाने १६ मे रोजी तैपेई व न्यूयॉर्क येथे लाँच केला जात असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे या फोनला बटण नाही तर फोनच्या कडाच सेंसरसह आहेत. म्हणजे फोनची फ्रेम टच सेंसिटीव्ह आहे व या फ्रेमवर विशिष्ट ठिकाणी टच करून युजर व्हॉल्यूम कमी जास्त करणे अथवा अॅप्स एक्सेस करणे अशी कामे करू शकणार आहेत. जगातला हा पहिलाच बटण नसलेला अशा प्रकारचा फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या फोनसाठी ५.५ इंची क्यूएचडी डिस्प्ले दिला गेला आहे. स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, अँड्राईड नगेट ७.०, १६ एमपीचा फ्रंट तर १२ एमपीचा रियर कॅमेरा,३००० एमएएच ची क्विक टेक्नॉलॉजीसह बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येत असून ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरी व ६ जीबी रॅम,१२८ जीबी मेमरी अशी ही दोन व्हेरिएंट आहेत.

Leave a Comment