मांजरांवरून ब्रिटन, रशियात जुंपली


या बातमीवर विश्वास ठेवणे अवघड असले तरी ही बातमी १०० टक्के सत्त्य आहे. म्हणजे ब्रिटन व रशिया यांच्यात मांजरांवरून जुंपली असून या दोन्ही देशातील नागरिकांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला आहे. गेले दोन दिवस ब्रिटन व रशियात अटीतटी सुरू असून दोन्ही देशांतील राजनितीक संबंधही ताणले गेले आहेत. ब्रिटनमध्ये सध्या सुरू असलेल्या कॅट शो मध्ये आपल्याच देशाच्या मांजराला वर्ल्डस बेस्ट कॅट खिताब मिळावा यावरून सोशल मिडीयासह अन्य मार्गाने नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहेत.

या स्पर्धेसाठी अनेक देशांची मांजरे आली आहेत. ब्रिटनच्या माओग्लोटस स्टोनहोंज व रशियाच्या स्कॉटिश फोल्ड या दोघांत अंतिम निवड केली जाणार आहे. या दोन्ही मांजरांनी प्राथमिक राऊंड जिंकून आपली दावेदारी पक्की केली आहे. स्टोनहेंज गतवर्षाची बेस्ट कॅट आहे व तिला आता फोल्ड टक्कर देते आहे. दोन्ही देशांचे नागरिक जजच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

जगात मांजरांच्या ३७ विविध जाती आहेत. त्यातील बहुतेक जंगली आहेत. विशेष म्हणजे सिंह, वाघ, तरस, बिबटे हे मांजारकुळातले मोठे प्राणी आहेत.

Leave a Comment