अक्षय्य तृतीयेमुळे सोन्याची ३० हजारांची भरारी


येत्या शुक्रवारी येत असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तामुळे देशात सोन्याच्या भावांनी भरारी घेतली असून हे भाव १० ग्रॅमला ३० हजारांवर पोहोचले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत त्यात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चांदी मात्र किलोमागे १०० रूपयांनी घसरून ४१७०० रूपयांवर आली आहे.

अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला जातो व त्यामुळे या दिवशी सोनेखरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सोने भेट देण्याचीही प्रथा पाळली जाते. त्यामुळे सोन्याचे दर वाढत चालले आहेत मात्र औद्योगिक मागणी घटल्याने चांदीचे दर उतरले आहेत असे सराफी बाजारातून समजते. सोन्याची वाढती मागणी हा शुभसंकेत समजला जात आहे. मागणी अशीच राहिली तर सोन्याचे दर आणखी वाढतील असे सोने व्यावसायिकांचे म्हणणे आहे.जागतिक स्तरावर सोने दर हेही स्थानिक बाजारातील सोने दर ठरण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात व सध्या जागतिक पातळीवरही सोन्याचे दर वाढले आहेत.

Leave a Comment