फ्लिपकार्टच्या रिटर्न पॉलिसीत कठोर बदल


बेंगळूर – आपल्या रिटर्न पॉलिसीमध्ये ई-व्यापार क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने कठोर बदल केला असून आता मोबाईल, वैयक्तिक सौंदर्य प्रसाधने, संगणक, कॅमेरा, कार्यालयीन उपकरणे, फर्निचर आणि स्मार्ट वियरेबल्स फ्लिपकार्टवर खरेदी केल्यानंतर रिफंड देण्यात येणार नाही. हा निर्णय विक्रेत्यांच्या ऑपरेशन खर्चाची बचत करण्यासाठी घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. आपल्या वेबसाईटवर रिटर्न पॉलिसीची माहिती फ्लिपकार्ट कंपनीने दिली आहे.

कस्टमर प्रेन्डली रिफंड पॉलिसी आपल्या सर्व ग्राहकांना कंपनीकडून देण्यात येत आहे. सध्याच्या १८०० श्रेणीपैकी ११५० उत्पादनांच्या प्रकारात सेल्फ सर्व्हिस पर्यायातून ग्राहक रिफंडची विनंती करू शकतात. सर्व श्रेणीतील दोन तृतीयांश उत्पादनांवर फ्लिपकार्टची रिफंड पॉलिसी लागू आहे. फ्लिपकार्टकडून प्रतिदिनी २५००० रिफंड करण्यात येतात, यापैकी ६० टक्के प्रकरणात तत्काळ रिफंड देण्यात येतो, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले.

विक्रेत्यांकडून फ्लिपकार्टच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. कंपनीचे फ्लिपकार्टच्या नवीन धोरणाने नुकसान होईल असे सांगण्यात येते. ग्राहक कंपनीच्या रिफंड पॉलिसीवर विश्वास असल्याने ऑनलाईन खरेदी करतात. फ्लिपकार्टच्या नवीन पॉलिसीमध्ये चांगल्या आणि नुकसानकारक बाबी आहेत. या धोरणाने कंपनीच्या ऑपरेशन खर्चात कमी येईल, मात्र दीर्घ काळासाठी ग्राहक दूर जाण्याचा धोका आहे.

Leave a Comment